Vaibhav Khedekar : वैभव खेडेकरांना मोठी अॅाफर? भाजप अन् राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; तळकोकणात काय घडतयं?

Vaibhav Khedekar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीतील मोठे नेते महायुतीत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यामुळे महाविकास आघाडीला गळती लागली असून महायुतीमध्ये इन्कमिंग चांगलेच वाढू लागलं आहे.
नुकतेच कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे वैभव खेडेकर यांच्यावर काही पक्षांच्या नेत्यांसोबत गाठीभेटी घेतल्यामुळे मोठी कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
यानंतर खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच आपली भूमिका जाहीर करू, असं स्पष्ट केलं. अशातच आता त्यांना महायुतीमधील दोन मोठ्या पक्षांकडून पक्षात दाखल होण्यासाठी अॅाफर मिळल्याची चर्चा कोकणच्या राजकारणात रंगली आहे.
भाजपने टायमिंग साधलं?
खरंतर वैभव खेडेकर हे मनसेचे आणि राज ठाकरे यांचे खंदे शिलेदारांपैकी एक होते. पक्षासाठी त्यांनी विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. याशिवाय तळकोणतात मनसेचा एक मोठा नेता म्हणून खेडेकर यांची ख्याती आहे. मनसे तळकोकणात वाढण्यात आणि रुजविण्यात त्यांचा मोठा हात आहे. त्यांच्यासह इतर तीन नेत्यांनी देखील मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्यावर थेट पक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. या सगळ्या राजकीय घडोमोंडीमध्ये भाजपने परफेक्ट टाइमिंग साधलं आहे.
कोणता झेंडा घेणार?
एका बड्या नेत्यालाच खेडेकर यांच्यासह कारवाई झालेल्या त्या शिलेदारांना आपल्याकडे घ्या असे थेट आदेश दिले आहेत. याशिवाय अजितदादांच्या आमदारानेही खेडेकर यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरू आहे. यामुळे आता वैभव खेडेकर आगामी काळात कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
स्वतः दिली माहिती
तळ कोकणाचं राजकारणचं केंद्रबेंदू असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये पक्ष वाढीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषेद भाजपचे मंत्री मंत्री नितेश राणे यांनी पहिला फोन केल्याची माहिती दिली. तसेच आमदार शेखर निकम यांनी फोन केला. माजी आमदार संजय कदम यांचाही फोन केल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
बाजू न ऐकताच…
खेडेकर यांच्यावर मनसेतून थेट निलंबनाची कारवाई केल्यानंतर यावर बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले मनसे तळागाळापर्यंत जावी, मतदारसंघात मनसेचा आमदार व्हावा यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न केला. आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याशी पंगा घेतला. पण बाजू न ऐकताच मला निलंबित करून अशा पद्धतीने निष्ठेचं फळ पक्षाने दिल्याचे खेडेकर म्हणाले. यामुळे सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं वैभव खेडेकर म्हणाले आहेत.





