लखनऊ : उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची दुर्दैवी घटना घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली असल्याचे सांगण्यात येत आहे.
#UPDATE | UP: Five people lost their lives while seven were injured after fire broke out in a 3-storey building in Moradabad. People of the same family were residing in the building. Fire dept conducting further probe to ascertain the reason: Shailendra Kumar Singh, DM, Moradabad https://t.co/dHNUTt8IyD pic.twitter.com/K32BLObSm9
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 25, 2022
स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले, “मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहे.”