Urvashi Rautela – भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला ३० डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. तेव्हापासून पंतवर डेहराडूनमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर पंतला डेहराडूनहून विमानाने आणून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कोकिलाबेन हॉस्पिटलचा एक फोटो शेअर केल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे.
#INDvsSLVideo | समजणार नाही लोकांना…! राहुल द्रविड जेव्हा पुण्यातून मराठीमध्ये बोलतात…
आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतचा हा अपघात झाला. गाडी चालवत असताना झोप लागल्याने त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि अत्यंत वेगाने ती क्रॅश झाली. यामध्ये पंत कसा तरी गाडीच्या दरवाजातून बाहेर पडला. अपघातानंतर त्याच्या गाडीची झालेली अवस्था पाहता त्याने मोठ्या धाडसाने आपले प्राण वाचवले. या अपघातात पंतला कपाळ, मनगट, गुडघा आणि घोट्याला गंभीर दुखापत झालेली आहे. पंतवरील पुढील उपचार आता बीसीसीआयच्या देखरेखीखाली होणार असल्याने त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
ऋषभ पंतबाबत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकवेळा चर्चेत राहिली. त्याचबरोबर उर्वशीच्या बऱ्याच गोष्टींचा संबंध हा थेट पंतशी जोडला गेला. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोघांच्या नावाने अनेक किस्से घडल्याचेही आपण पहिले आहे. दरम्यान, पंतला गुरुवारी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर एका स्टोरीमध्ये त्याच हॉस्पिटलच्या इमारतीचा फोटो शेअर केला. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंतच्या अपघातानंतर या अभिनेत्रीने त्यांच्या आरोग्यासाठी अनेकदा प्रार्थना केली आहे. उर्वशीची आई मीरा रौतेला यांनीही पंतने लवकर बरे व्हावे अशी सोशल मीडियावर पोस्ट टाकलेली आहे.
Urvashi Rautela roaming in Kokilaben hospital after knowing Rishabh Pant is admitted there pic.twitter.com/xh7WGUMTGd
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) January 6, 2023
Urvashi Rautela’s stalking of Rishabh Pant continues. Creepy madness. pic.twitter.com/e5VPugAU6o
— Khalid Baig (@KhalidBaig85) January 6, 2023
In India, Men do not have any recourse against obsessed Women
It’s NOT FUNNY anymore @UrvashiRautela #RishabhPantAccident #RishabhPant #UrvashiRautela #VoiceForMen pic.twitter.com/3io71nPSl3
— Voice For Men India (@voiceformenind) January 6, 2023
ऋषभ पंत उपचार घेत असलेल्या या हॉस्पिटलचा एक फोटो उर्वशीने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून स्टोरीला शेअर केल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधलाय. याच मुद्द्यावरून अनेक जणांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांच्या मते, उर्वशी पंतच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिला त्या पोस्टमुळे विरोध होत असल्याचे दिसत आहे.
If you feel this is absolutely sick & @UrvashiRautela needs to be finally called out for it, please tag her and say #GetWellSoonUrvashi
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) January 5, 2023