गणेश विसर्जनसाठी वाहतूक विभागाची तयारी; हे रस्ते राहणार बंद

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त गुरूवारी शहरातील रस्ते बंद केले जाणार आहेत. शहर वाहतूक पोलिसांनी यंदाही वर्तुळाकार मार्गाची आखणी केली आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मध्यवस्तीत न जाता बाहेरून जाणे शक्‍य होणार आहे.

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख विसर्जन मार्गांसह शहरातील मध्यवर्ती भागांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ गुरूवारी सकाळी 10च्या सुमारास होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून मध्यभागातील सुमारे 17 रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बदल विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत लागू राहणार आहेत. शुक्रवारी शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येतील किंवा ज्या मार्गावरील मिरवणुकीचा समारोप झालेला असेल, तो मार्ग तातडीने खुला करून देण्यात येईल. अत्यावश्‍यक सेवेतील वाहने (पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका) वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


 • सकाळी 7 वाजता बंद होणारे रस्ते
 • शिवाजी रस्ता – काकासाहेब गाडगीळ पुतळा, जंक्‍शन ते जेधे चौक
 • लक्ष्मी रस्ता – संत कबीर चौकी ते अलका टॉकिज चौक
 • सकाळी 9 वाजता बंद होणारे रस्ते 
 • बगाडे रस्ता – सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक
 • गुरू नानक रस्ता – गोविंद हलवाई चौक
 • टिळक रस्ता – जेधे चौक ते टिळक चौक
 • सकाळी 10 वाजता बंद होणारे रस्ते 
 • गणेश रोड – दारूवाला पूल ते जिजामाता चौक
 • केळकर रस्ता – बुधवार चौक ते अलका टॉकिज
 • दुपारी 12 वाजता बंद होणारे रस्ते
 • बाजीराव रस्ता – बजाज पुतळा ते फुटका बुरूज चौक
 • कुमठेकर रस्ता – टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
 • शास्त्री रस्ता – सेनादत्त पोलीस चौकी-अलका टॉकिज चौक
 • सायंकाळी 4 वाजता बंद होणारे रस्ते 
 • जंगली महाराज रस्ता – झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक
 • कर्वे रस्ता – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
 • फर्गसन रस्ता – खंडोजीबाबा चौक ते फर्गसन कॉलेज
 • भांडारकर रस्ता – पीवायसी जिमखाना ते नटराज चौक
 • पुणे-सातारा रस्ता – होल्गा चौक ते जेधे चौक
 • सोलापूर रस्ता – सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
 • प्रभात रस्ता – डेक्कन पोस्ट ते शेलारमामा चौक

 • या मार्गांनी वाहतूक वळवणार
 • जंगली महाराज रस्ता – झाशीची राणी चौक
 • शिवाजी रस्ता – गाडगीळ पुतळा
 • मुदलीयार रस्ता – अपोलो टॉकिज
 • नेहरू रस्ता – संत कबीर पोलीस चौकी
 • सोलापूर रस्ता – सेव्हन लव्हज चौक
 • पुणे-सातारा रस्ता – होल्गा चौक
 • बाजीराव रस्ता – सावरकर पुतळा चौक
 • शास्त्री रस्ता – सेनादत्त पोलीस चौकी
 • कर्वे रस्ता – नळस्टॉप
 • फर्गसन कॉलेज रस्ता – गुडलक चौक

पार्किंग सुविधा
एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुलाची वाडी, पूरम चौक ते हॉटेल विश्‍व (रस्त्याची डावी बाजू), दारूवाला पूल ते खडीचे मैदान (गणेश रोड), गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, कॉंग्रेस भवन (म.न.पा रोड), जयंतराव टिळक पूल ते भिडे पुलादरम्यानचा नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग.


येथे नो – पार्किंग
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्गसन रस्ता, खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या 100 मीटर परिसरात पार्किंग बंदी आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×