Sanjay Raut : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खोचक सवाल; पण CM फडणवीसांचं तोंडभरून कौतुक! संजय राऊतांनी असं का केलं?

Sanjay Raut : मराठा आरक्षणावर राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत हैदराबाद गॅझेटियर तातडीनं लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. पण मनोज जरांगे यांनी केलेल्या ८ पैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. काल २ सप्टेबंर रोजी आझाद मैदानावर विजयी गर्जना करत मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सोडलं. यानंतर मराठा बांधवांनी मुंबईत विजयी जल्लोष साजरा केला.
या निर्णय प्रक्रियेत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी जरी निर्यणाची प्रत मनोज जरांगे यांना दाखवली. तरी त्या अगोदर मसुदा अंतिम करण्यापर्यंत संपूर्ण प्रकियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, अशी माहिती आहे. मराठा आरक्षणाला घेऊन वर्षा निवास्थानी बैठकांचा सिलसिला सुरू होता. अखेर काल २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी आंदोलनस्थळी जरांगेंची भेट घेतली. त्यानंतर जरांगेंनी आमरण उपोषण सोडलं.
दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते?
मराठा आरक्षणाच्या निर्णयावर आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक करीन. आंदोलक नेत्यांनी फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केली. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे, असं म्हणत राऊतांनी फडणीसांचे तोंडभरून कौतुक केलं. तर काल दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल राऊतांनी केला.
फडणवीस स्वत: वाटाघाटीत गुंतलेले.
जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते, त्या समाजाचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गुलाल उधळायला नवी मुंबईत गेले होते. काल ते कुठे दिसले नाहीत, याचं कारण काय? फडणवीस स्वत: वाटाघाटीत गुंतलेले. बाकी एकनाथ शिंदे, अजित पवार कुठे होते? ते आनंद सोहळ्यात का सहभागी झाले नाहीत? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
फडणवीसांचे कौतुक करत नेमकं काय म्हणाले?
जेव्हा मनोज जरांगे पाटील इथे आले, तेव्हा टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. टोकाची, घाणेरडी भाषा वापरली गेली, एकटे फडणवीस सोडले, तर सगळ्यांनी ही भाषा वापरली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक करीन. आंदोलक नेत्यांनी फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केली. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे, असं म्हणत फडणवीसांनी दाखवलेल्या संयमाचं राऊतांनी तोंडभरून कौतुक केलं.
हेही वाचा : अशा चारित्र्यहीन पक्षाबद्दल…” ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची जोरदार टीका





