Sanjay Raut : “लोकं कबुतरांसाठी आंदोलन करतात तर….”; मराठा आरक्षणावर संजय राऊतांच मोठं विधान

Sanjay Raut : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांनी समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यांचा ताफा आता पुणे जिल्ह्यातून जात आहे. त्यांनी किल्ले शिवनेवरीवर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरून सांगतो देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला मरेंपर्यंत तुमचे उपकार विसणार नाही, हा आमचा शब्द आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
अशातच आता मराठा आरक्षणावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत येण्यासापासून मराठी माणसाला थांबवू नये, लोकं कबुतरांसाठी आंदोलन करतात. त्यामुळे मराठी माणसांना आंदोलन करण्यासाठी अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ही राजधानी मराठी माणसाच्या आहे त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी जर मुंबईची निवड केली असेल, तर मुंख्यमंत्रींनी आंदोलनकांशी संवाद साधणं गरजेचे असल्याचं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. ऐन गणपतीमध्ये मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात काळजी घेण गरजेचं आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राजकारण केलं जात असल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणावर राजकारण?
मराठा आरक्षणावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे राजकारण आम्ही करत नाही आहोत. जातींजातींमध्ये भेदाभेद करण्याच काम १० वर्षांपासून केलं जात आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माणसाची एकजूट उभारली. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मंत्राचे ठिकऱ्या उडविण्याचं काम सुरू असल्याचं विधान त्यांनी केलं आहे.
हेही वाचा : R Madhavan: आर. माधवन लेहमध्ये अडकले; मुसळधार पावसामुळे विमानसेवा बंद, ‘3 इडियट्स’च्या शूटिंगची आठवण काढली





