Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत; ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार? शिंदे-आष्टीकर भेटीने खळबळ
Maharashtra politics : शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटातील तब्बल सहा खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी संजय जाधव हे ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर ईशान्य मुंबईतील खासदार संजय पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने चर्चांना अधिक उधाण आलं होतं. (Maharashtra politics)
आता हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. नागेश पाटील आष्टीकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच सोमवारी त्यांनी शिंदेंसोबत जवळपास पाऊण तास चर्चा केल्याचं समोर आलं आहे.
भेटीमागे राजकीय संकेत?
या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आलं असताना, नागेश पाटील आष्टीकर यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. मतदारसंघातील काही कामांसंदर्भात पत्र देण्यासाठी आपण शिंदेंची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेतून पाहिलं जात आहे. (Maharashtra politics)
याआधीही काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातील आठ खासदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी या संदर्भात काही खासदारांची बैठक झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले होते. (Maharashtra politics)
दरम्यान, पुन्हा एकदा सुरू झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी उलथापालथ होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra politics)





