Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कृतीने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. नेमकी घटना काय? (Eknath Shinde) खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. सध्या त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वेळ काढून थेट रुग्णालय गाठले. राजकीय मतभेद बाजूला सारून शिंदेंनी पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. (Eknath Shinde) राजकीय संस्कृती की ‘ऑपरेशन टायगर’ची नांदी? (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे त्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावासाठी ओळखले जातात. यापूर्वी संजय राऊत आजारी असताना त्यांनी सुनील राऊत यांना फोन करून विचारपूस केली होती. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. Eknath Shinde: ठाकरे गटाच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात; एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात दाखल, चर्चांना उधाण गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत. एप्रिल महिन्यात ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात उपमुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक झाल्याची चर्चा रंगली होती. या कथित बैठकीला संजय दिना पाटील यांच्यासह अरविंद सावंत, संजय देशमुख आणि इतर खासदारांची उपस्थिती असल्याचा दावा केला जात होता, जो नंतर ठाकरे गटाने फेटाळला होता. Eknath Shinde राजकीय संघर्षाच्या काळात उपमुख्यमंत्री शिंदेंनी दाखवलेले हे ‘सौजन्य’ केवळ माणुसकीच्या नात्याने आहे की यामागे काही मोठे राजकीय समीकरण शिजत आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Eknath Shinde) दरम्यान, या भेटीनंतर ठाकरे गटातील अंतर्गत गोटात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली, तरी “राजकीय वैर एका बाजूला आणि वैयक्तिक संबंध दुसऱ्या बाजूला” अशी चर्चा आता रंगू लागली आहे.