Operation Tiger 3 : ‘ऑपरेशन टायगर’च्या तिसऱ्या अंकांची तयारी सुरू? ठाकरेंसह राष्ट्रवादीचे आमदार, नगरसेवकही शिंदेंच्या संपर्कात???
Operation Tiger 3 : शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना ५ कोटींचा विशेष निधी देण्यात येणार असल्याची चर्चा

Operation Tiger 3 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’ राबवताना ठाकरेसेनेचे ६ खासदार व विधानपरिषदेचे आमदार सचिन आहिर यांना पक्षात घेतले होते.
यामुळे ठाकरेसेनेला मोठा धक्का बसला असताना, आता शिंदेंकडून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या तिसऱ्या अंकाची तयारी सुरु केली असल्याचे दिसून आले आहे. यावेळी शिंदेंच्या रडारवर ठाकरेसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार, आमदार व नगरसेवकही रडारवर असल्याचे चित्र आहे. Operation Tiger 3
दोन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी शिंदेंची भेट घेतली असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, ठाकरेसेनेतील तब्बल १० आमदारांनी प्रवेशाची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.
मात्र पक्षांतरबंदी कायद्याचा जाच टाळण्यासाठी अजून ५ आमदारांची आवश्यकता असून उर्वरित आमदारांना गळाला लावण्यासाठी तयारी केली जात असल्याचे देखील बोलले जात आहे. याबरोबरीने ठाकरेसेनेतील विद्यमान खासदारासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचे समजते आहे.
या तिसऱ्या अंकामध्ये ठाकरेसेनेच्या बरोबरीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार व खासदार रडारवर असून त्यांच्याशी प्राथमिक बोलणी झाल्याचेही वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या संपूर्ण अंकाची जबाबदारी शिंदेसेनेतील एक माजी मंत्री व एका विद्यमान खासदाराकडे देण्यात आली आहे. Operation Tiger 3
नाशिकपासून सुरुवात ?
नाशिक महानगर पालिकेत तिसऱ्या अंकाचा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. ठाकरेसेनेचे १० ते १२ नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात असून नाशिकमधूनच तिसऱ्या अंकाची सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना ५ कोटींचा विशेष निधी देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या नाशकात रंगली आहे. शिंदेसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी हे ऑपरेशन टायगर नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी असलेले आकर्षण असल्याचे सांगताना, तिसऱ्या अंकाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. Operation Tiger 3
हेही वाचा:
Pune : पालखी आगमनापूर्वी बुधवार चौकात ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू






