Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ ची चर्चा रंगली असतानाच, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (शिंदे गट) मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Eknath Shinde) पक्षाच्या आक्रमक नेत्या आणि प्रवक्त्या शायना एन.सी. या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शायना एन.सी. या विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र, पक्षाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. ही नाराजी आता पक्षबदलाच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचे समजते. (Eknath Shinde) सुनेत्रा पवारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण शायना एन.सी. यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे त्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. जर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना महत्त्वाची जबाबदारी किंवा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘ऑपरेशन टायगर’ला प्रत्युत्तर? एकनाथ शिंदे यांचा गट ठाकरे गटातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर‘ राबवत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अशातच सत्ताधारी मित्रपक्षातील (महायुती) अंतर्गत ओढाताण समोर आल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढू शकते. (Eknath Shinde) शायना एन.सी. यांनी अद्याप त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत किंवा नाराजीबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र, त्यांच्या सोशल मीडिया हालचाली आणि भेटीगाठी पाहता, लवकरच मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Eknath Shinde)