Pune Accident: शिवसेना ठाकरे गटातील नेत्याचा भीषण अपघात, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू
Pune Accident: चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात

Pune Accident: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे. यात या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर फॉर्च्युनरमधील तिघे जण जखमी झाल्याची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे देखील या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं. Pune Accident
SPPU News : बेकायदा शुल्क आकारल्यास कॉलेजवर कारवाई; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इशारा
विकास अर्जुन पारखी असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या अपघात प्रकरणात मुळशीतील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं नुकसान
दरम्यान, या अपघातामध्ये रिक्षा आणि फॉर्च्युनर या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही वाहन मोठ्या प्रमाणात डॅमेज झाले, तर रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षाचालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Pune Accident
हेही वाचा :





