Muralidhar Mohol : केंद्रीय विमान व नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. याची माहिती स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांना नेमकं काय झालयं आहे याविषयी देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच एक महिना विश्रांती घेणार असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. पोस्टमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी २९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेविषयी सांगितले आहे. त्यांना त्यावेळी कुस्ती खेळताना पायाला दुखापत झाली होती. इतकी वर्ष होऊनही त्रास वाढू लागला असल्याने शेवटी डॅाक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला त्यांना दिला. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली. हेही वाचा : Raftaar Movie: ‘रफ्तार’मध्ये राजकुमार राव-कीर्ती सुरेश एकत्र; कथेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता नेमकं काय म्हणाले मुरलीधर मोहोळ? (Muralidhar Mohol ) क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! २९ वर्षांपूर्वी… कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती ! खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? असा प्रश्न त्यांनी स्वतः केला आहे. Muralidhar Mohol पुढे ते म्हणतात, दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने… अशी ग्वाही त्यांनी पोस्टमधून दिली आहे. हेही वाचा : Vanshika Chadha : बालपणीची मैत्रीण होणार जोडीदार! कुलदीप यादवची होणारी पत्नी वंशिका चड्ढा कोण?