Murlidhar Mohol: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘पोलीस मित्र संघटना २०२६’ दिनदर्शिकेचे प्रकाशन
Murlidhar Mohol : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२६ च्या नवीन दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
Updated On:

Murlidhar Mohol: महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२६ च्या नवीन दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, अतुल पाटील, मनीष सोनिगरा, रणजित कलापुरे, सुरज कपोते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनदर्शिकेचे प्रकाशन केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी संघटनेच्या कामाचा गौरव केला. “पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून पोलीस मित्र संघटना मोलाचे कार्य करत आहे. समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा संघटनांचे सहकार्य कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत त्यांनी संघटनेचे कौतुक केले.




