Ajit Pawar : “महाराष्ट्र राज्याचे कणखर, कार्यक्षम आणि खमके नेतृत्व लाभलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन अत्यंत दुर्दैवी आणि मनाला खोल वेदना देणारं आहे.” अशी भावना केंद्रीय राज्य नागरी उड्डाण मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. ही बातमी मुरलीधर मोहोळ यांनी देखील धक्का देणारी असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्यावेळी मुरलीधर मोहोळ हे पुण्याची महापौर होते, त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत निकटचा आणि आपुलकीचा संबंध निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कोरोना संकट काळात त्यांनी पक्षीय भिंती बाजूला ठेवून पुणे शहरातील परिस्थिती, उपाययोजना आणि निर्णयप्रक्रियेबाबत सातत्याने संवाद साधला.अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी मला विश्वासात घेतलं. हे नातं नंतरच्या काळातही कायम राहिलं. असल्याचे मोहोळ म्हणाले आहेत. हेही वाचा : Ajit Pawar: “देव कुटुंबासाठी हा अत्यंत हृदयद्रावक क्षण…” अजित पवारांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत, ही गोष्ट मन अजूनही स्वीकारायला तयार नाही, असे देखील मोहोळ म्हणाले आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ एकमेकांविरोधात उभे होते. याची आठवण सांगत या निवडणुकीतही आदरणीय अजितदादांनी सामोपचाराची भूमिका घेतली. महाराष्ट्र राज्याचे कणखर, कार्यक्षम आणि खमके नेतृत्व लाभलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन अत्यंत दुर्दैवी आणि मनाला खोल वेदना देणारं आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत, ही गोष्ट मन अजूनही स्वीकारायला तयार नाही. माझ्याकडे पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी… pic.twitter.com/ap4ACw9syh — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 28, 2026 तसेच महापालिका निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार स्वत: मैदानात उतरले होते. पायाला भिंगरी बांधून त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय सामाना रंगल्याचे पाहायला मिळाले. Ajit Pawar Murlidhar Mohal यावर देखील मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान आमच्यात आरोप-प्रत्यारोप झाले असतील, मात्र एकमेकांबद्दल द्वेषाची भावना कधीही नव्हती आणि मनभेदही नव्हते ! असे म्हटले आहे.अजितदादा पवार यांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी शब्दशः मोठी हानी आहे ! आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली ! हेही वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर दिल्लीपासून ते राज्यापर्यंत सर्व दिग्गज नेते भावुक