Vanshika Chadha : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव लग्नबंधनात अडणार आहे. आपली बालमैत्रीण वंशिका चड्ढा हिच्यासोबत तो सात फेरे घेणार आहे. १४ मार्च रोजी मसुरी येथील ऐतिहासिक हॉटेल सॅवॉय येथे मोठ्या थाट्यात विवाह सोहळा पार पडणार आहे. कुलदीप यादव बोहल्यावर चढणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर कुलदीप यादवचा आपल्या आयुष्यात हा खास क्षण असणार आहे. जिच्यासोबत कुलदीप सात फेरे घेणार ती वंशिका चड्ढा नेमकी कोण आहे तिच्याविषयी जाणून घेऊयात… कुलदीप आणि वंशिका एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. वंशिका चड्ढा ही भारतातील प्रतिष्ठित वित्तीय संस्थेत म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ती प्रशासनिक किंवा व्यवस्थापकीय पदावर काम करत आहे. तिने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. कुलदीप यादव क्रिकेटमुळे नेहमीच चर्चेत असला तरी वंशिका मात्र लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. हेही वाचा : North Korea Missile Launch: उत्तर कोरियाचे पुन्हा क्षेपणास्त्र प्रक्षेपण; जपान सतर्क, पूर्व आशियात तणाव वाढण्याची शक्यता कुलदीप आणि वंशिका यांनी ४ जून २०२५ रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर २०२६ मध्ये त्यांचे लग्न होत आहे. १३ मार्चपासून दोघांची पारंपरिक हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होऊ शकतात, अशी माहिती आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू लग्न सोहळ्याच्या अगोदर होण्याऱ्या विधिसाठी उपस्थित राहिले आहेत. हळदी समारंभातील युगेंद्र चहलचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल कुलदीपला हळद लावताना दिसत आहे. कुलदीप यादव आयपीएलमध्ये खेळणार टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतील. कुलदीप यादव आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. हेही वाचा : Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची होणार सुटका; केंद्र सरकारकडून NSA अंतर्गत कारवाई रद्द