Pune: क्रेडाई पुणेने नुकतीच जनरल बॉडी मीटिंग यशस्वीपणे आयोजित केली. या बैठकीत शहराच्या शहरी विकास आणि रिअल इस्टेट क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आघाडीचे डेव्हलपर्स, उद्योगतज्ज्ञ आणि धोरणनिर्माते सहभागी झाले. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांनी गेल्या वर्षभरात क्रेडाई पुणेने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थितांना संबोधित करताना रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता वाढवण्यासाठी क्रेडाई पुणेने घेतलेल्या पुढाकारांचे कौतुक केले. ते म्हणाले, पुणे सर्वात राहण्यायोग्य शहर ठरणे ही एक-दोन लोकांची कामगिरी नसून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, पुण्याच्या भविष्यातील शहरी विकास घडवण्यात रिअल इस्टेट क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. क्रेडाई पुणेचे उपाध्यक्ष अरविंद जैन म्हणाले, जबाबदार डेव्हलपर्सची भूमिका आज अधिक महत्त्वाची झाली आहे.