“पक्ष सोडण्यामागे फार मोठं…”; प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टचं बोलले!

Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. जगताप यांनी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर रोहित पवार यांनी भाष्य करत पक्ष सोडण्यामागे फार मोठं कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण हे कारण काय आहे, हे मी आताच सांगणार नाही, असे देखील रोहित पवार म्हणाले आहेत. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिमुळे जगताप यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यात रोहित पवार आले होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. याबाबची घोषणा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. त्यानंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. याबाबची अधिकृत घोषणा लवकरच हणार आहे.
हेही वाचा : मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का! राखी जाधव तुतारी सोडून कमळ हाती घेणार? हालचालींना वेग





