Pune : वाढदिवसाचा आनंद दुष्काळग्रस्तांसोबत! गौरव घुले यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखांची मदत
Pune : पुण्यातील नगरसेवक गौरव घुले यांनी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

Pune : वाढदिवसाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम पुण्यातील नगरसेवक गौरव गणेश घुले यांनी केला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली.
पुणे महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सहकारी नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली. घुले हे प्रभाग क्रमांक २०-ड (शंकर महाराज मठ-बिबवेवाडी) येथील नगरसेवक आहेत.
यावेळी बोलताना घुले म्हणाले, की वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची संधीही आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मदत करणे, हाच वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद आहे.
तसेच प्रत्येकाने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे सभेतील सदस्यांनी स्वागत केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यापुढेही नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी सक्रिय राहणार असल्याचा निर्धार गौरव घुले यांनी व्यक्त केला.





