नवी दिल्ली – चालू विमानामध्ये स्वच्छतागृहामध्ये पडल्यानंतर वैमानिकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. आपत्कालिन परिस्थिती ओळखून सहवैमानिकाने इमर्जन्सी लॅन्डिंग केले. त्यामुळे विमानातील सर्व प्रवासी सुखरुप राहिले आहेत. मियामीवरून चिलीला जाणाऱ्या विमानामद्ये ही घटना घडली. सहवैमानिकाने पनामा बेटावर हे इमर्जन्सी लॅन्डिंग केले होते.
विमानाच्या स्वच्छतागृहामध्ये वैमानिक इव्हान आंद्रेउर हे अचानक कोसळले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. विमानातील कर्मचाऱ्यांनी वैमानिकांना वाचवण्यासाठी आपत्कालिन प्रथमोपचार केले. मात्र त्याचा उपयोग होऊ शकला नाही.
आपत्कालिन परिस्थिती ओळखून सहवैमानिकाने पनामाच्या टोकोमेन या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवले. तेथे लगेचच आंद्रेउर यांच्यावर वैद्यकिय उपचार केले गेले, मात्र त्याचाही ुपयोग होऊ शकला नाही. त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत, असे विमान कंपनीने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. हे विमान मंगळवारी पनामामधून निघाले आणि चिलीच्या दिशेने मार्गस्थ झाले.