नवी दिल्ली :- भारत आणि ब्राझील यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय संसदीय सदिच्छा शिष्टमंडळाने नुकतीच ब्राझीलला भेट दिली.
या भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केले. भारत आणि ब्राझील दरम्यान सामायिक लोकशाही मूल्ये आणि शांततेचे प्रतीक असलेला गांधीजींचा हा पुतळा ब्राझिलिया आणि रिओ दी जनेरियो शहराच्या उद्यानांच्या मध्यभागी आहे.
मंगळवारी शिष्टमंडळाने फेडरल सिनेट या ब्राझीलच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष रॉड्रिगो ओटावियो सोरेस पाशेको यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान झालेली देवाणघेवाण भारत आणि ब्राझील यांच्यातील वाढत्या धोरणात्मक भागीदारीचा पाठपुरावा घेण्यात आला. शिष्टमंडळाने भारत-ब्राझील मैत्री आघाडीचे अध्यक्ष सिनेटर नेल्सन ट्रेड आणि आघाडीच्या इतर प्रमुख सदस्यांचीही भेट घेतली.
बारत आणि ब्राझिल दरम्यान एकूण द्विपक्षीय व्यापार 2020 मधील 7.05 अब्ज डॉलरवरून 115 टक्क्यांनी वाढून 2022 मध्ये 15.20 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. रिओ दि जानेरो आणि ब्रासिलिया येथे प्रल्हाद जोशी यांनी ब्राझीलमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली.