पळसदेव, (प्रतिनिधी) – पळसदेव माळेवाडी हवालदार चौक शेलारपट्टा असा सुमारे चार किमी रस्त्याला आमदार दत्तात्रय भरणे यांनी सात कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातील सुमारे ३ किमी रस्त्याचे डांबरीकरण व एक किमी सिमेंटच्या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेतच सिमेंटच्या रस्त्याची साईटपट्टीवर असलेल्या विद्युतवाहक खांबामुळे अडथळा होत आहे. हे विद्युत खांब तातडीने हटवून साईड पट्ट्याचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या बाबत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मेघराज पाटील यांच्याशी संपर्क साधला आसता आम्ही ग्रामपंयातीच्या माध्यमातून अनेक वेळा ठेकेदार बबलू खत्री यांच्याशी संपर्क साधला असता ते सावर्जनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवत आहे व बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता पोल काढणे जबाबदारी ठेकेदाराची आहे, असं सांगत आहे. बांधकाम विभाग व ठेकेदार दोघेही आपली जबाबदारी झटकत आहेत व आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं मत मेघराज पाटील त्यांनी व्यक्त केल.
ठेकेदार बबलू खत्री व बांधकाम विभाग या दोघांनी जबाबदारी झटकण्यामुळे गावातील नागरिकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी ठेकेदाराने नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून तातडीने साईड पट्ट्यावरील विद्युत खांब हटवून गावातील मुख्य कमानीपासून ते हवालदार चौकापर्यंत केलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्या भरून घ्याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून ठेकेदाराच्या नियोजनामुळे व हलगर्जीपणामुळे अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत. अनेकांची डोकी फुटली,अनेक अनेक जणांचे फॅक्चर झाले व अनेकांना आपलं रक्त सांडवे लागलं तरी देखील ठेकेदाराला काहीही फरक पडत नसल्याचं चित्र आहे.
ठेकेदार एका बड्या राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्यामुळे तो पदाधिकारी व अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचं अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे. तरी ठेकेदाराने येथील नागरिकांच्या समस्यांचा विचार करून पळसदेव मुख्य कमान ते शेलारपट्टा येथील हवालदार चौकापर्यंत अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचं आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी भरणे यांनी आणला आहे. मात्र, हा निधी आणून भरणे यांना राजकीय फायदा होण्याऐवजी तोटा होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या रस्त्याच्या कामाला झालेली दिरंगाई व चुकीचे नियोजन यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यामध्ये जखमी होऊन अनेकांना हजारो रुपयाचा भुर्दंड भरावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे खुद्द आमदार भरणे यांनीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
कामे लवकर पूर्ण करणार…
याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता किशोर साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता पळसदेव रस्त्याच्या साईट पट्ट्या भरणे व मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला लागून असलेले विद्युत वाहक पोल हटवण्याबाबत तातडीने ठेकेदाराला सूचना करण्यात येईल व लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील करणार असल्याचं मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.