वडापुरी, (वार्ताहर) – शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांचा १४६ व्या प्रगटदिन भाटनिमगाव (ता इंदापूर) येथील गजानन महाराज मंदिरात उत्सवात साजरा करण्यात आला. भाटनिमगाव येथे सुभाष मोरे यांनी स्वखर्चाने गजानन महाराज यांचे मंदिर उभारले आहे. या ठिकाणी मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने १ मार्चपासून तीन दिवस विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले आहे.
या निमित्ताने दररोज मंदिरामध्ये काकडा,भजन, प्रवचन सायंकाळी हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामवंत संतोष मगर व दिलीप शिंदे महाराजांचे कीर्तन, असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.या वेळी बशीर मुलानी यांनी मंडप व साऊंड सिस्टीमचे सौजन्य दिले.
या वेळी दररोज तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. एम के इनामदार, मुंबई पोलीस निरीक्षक विजय ठाकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोंडे, डॉ. लामतुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुभाष मोरे,गणेश मोरे,पंजाबराव गायकवाड, महेश मोरे,मनोहर भोसले, उल्हास भोसले, महादेव खबाले,राजवली पठाण यांनी केले.