पुणे – दि को-ऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. प्रमोद बेंद्रे यांची एकमताने फेरनिवड झाली आहे. याबरोबरच ऍड. माधव सोमण यांची उपाध्यक्ष, ऍड. आदित्य कानेटकर यांची सचिव, ऍड. विक्रम दौंडकर यांची सहसचिव, ऍड. मिलिंद डहाके यांची खजिनदार आणि ऍड. जन्मजेय खुर्जेकर, ऍड. अश्विनी हसबनीस, ऍड. संजय काकडे, ऍड. वल्लभ पंचपोर, ऍड. अद्वैत भणगे, ऍड. नीलेश भरते यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
ही संघटना सहकार न्यायालय आणि सहकारी अधिकारी यांच्यासमोर काम करणाऱ्या वकिलांची आहे. ही निवड २०२१-२२ या कालावधीसाठी आहे. सहकार आणि निगडित अन्य कायद्याबाबत तज्ञ आणि अभ्यासूनची ऑनलाइन व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित करण्याचा मानस असल्याचे ऍड. प्रमोद बेंद्रे यांनी सांगितले.