रांची – भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने एका कुस्ती स्पर्धेच्या स्टेजवरच कुस्तीगिराला दोनदा थोबडवण्याचा प्रकार आज सर्वांसमक्ष घडला आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही सर्वत्र व्हायरल झाल्याने या खासदारावर टिकेचा भडिमार सुरू झाला आहे.
ब्रिजभुषण शरण सिंह असे या खासदाराचे नाव आहे. ते स्व:त भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ते आज रांचीत 15 वर्षाखालील गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी इकडे आले होते.
त्यांनी ज्या कुस्ती स्पर्धकाला थोबडवले तो स्पर्धक वयाच्या अटीत बसत नसल्याने त्याला स्पर्धेत भाग घेण्यास अनुमती देण्यात आली नव्हती. त्यामुळे तो खासदार ब्रिजभुषण यांना त्यासाठीचा आग्रह करीत होता. त्यामुळे खासदार साहेब संतापले आणि त्यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावली.