तेजश्री प्रधानने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका सोडण्याच्या चर्चांवर स्पष्टच सांगितले….

Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधानने अनेक मालिकांसह सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. ‘होणार सून मी ह्या घरची‘ या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यानंतर सध्या ती ‘वीण दोघांतली ही तुटेना‘ या नव्या मालिकेत काम करताना दिसत आहे. तिच्या या मालिकेला देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे.
मात्र तेजश्री या मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिने अचानक सोडण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आता स्वत: तेजश्रीने स्पष्टीकरण दिले आहे. Tejashree Pradhan |
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदी आणि समर यांच्या लग्नाचा सोहळा पार पडत आहे. अशातच तेजश्री मालिका सोडणार असल्याचे कळताच चाहते आश्चर्यचकीत झाले. मात्र तेजश्रीने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही. तरीही आपल्या अर्धवट माहितीद्वारे व्ह्युजसाठी बातम्या छापून आणू नयेत. झी मराठीशी असलेली ही वीण तुटणे नाही. लोभ असावा.” यावरून हे स्पष्ट होते की, तेजश्री या मालिकेतून सध्या तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही. Tejashree Pradhan |
मालिकांबरोबरच तेजश्रीने चित्रपटांतूनही आपला ठसा उमटवला आहे. ‘ती सध्या काय करते’ आणि ‘बांबू’ यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिकेचे देखील खूप कौतुक झाले होते. याशिवाय लवकरच ती वेबसीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचे म्हंटले जात आहे. Tejashree Pradhan |
हेही वाचा:
Pune District : ‘राष्ट्रीय एकता दिवस’ अभियानांतर्गत मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन





