‘१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनून…’; लोकप्रिय गायिकेने तेजश्रीसाठी व्यक्त केला आनंद

Tejashree Pradhan | मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानला झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर आता ती पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर परतली आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेतून ती अभिनेता सुबोध भावेसोबत प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमध्ये तेजश्रीने स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारली आहे, तर सुबोध समर राजवाडे हे पात्र साकारत आहे. ११ ऑगस्टपासून सुरु झालेल्या या मालिकेनंतर आता गायिका सावनी रवींद्र हिने सोशल मीडियावर तेजश्रीसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. Tejashree Pradhan |
विशेष म्हणजे, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेसाठी सावनीने पार्श्वगायन केलं आहे. याआधी सावनीने तेजश्रीच्या होणार सून मी ह्या घरची मालिकेत गाणं गायलं होतं. त्यानंतर आता पुन्हा सावनीने तेजश्रीच्या मालिकेचं शीर्षक गीत गायलं आहे. याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. Tejashree Pradhan |
View this post on Instagram
सावनी रवींद्रची पोस्ट
सावनीने तेजश्रीबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनून घराघरात पोहोचले… ‘होणार सुन मी ह्या घरची’ या मालिकेने आणि त्यातल्या गाण्यांनी इतिहास घडवला. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी तेजूसाठी पुन्हा गाण्याचा योग आला. निमित्त होतं, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नवीन मालिकेच्या शीर्षकगीताचं!’
पुढे ती म्हणाली, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या निमित्ताने इतिहासाची पुनरावृत्ती होवो हीच मोरया चरणी प्रार्थना. प्रिय तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे दादा या मालिकेसाठी तुम्हाला खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा.” या गाण्यासाठी सावनीला अभिजीत सावंतची साथ लाभली आहे. याबद्दल तिने ‘अभिजीतबरोबर गाणं गाण्याची मज्जा काही औरच’ असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याशिवाय तिने झी मराठी आणि गाण्याचे संगीतकार एव्ही प्रफुलचंद्र यांचेही आभार मानले. दरम्यान, या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी मालिकेचे शीर्षकगीत आवडल्याचे देखील म्हंटले आहे.
हेही वाचा :
‘राज्याच्या आणखी एका भाजप नेत्याकडे २ मतदार ओळखपत्रे’ ; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ





