तेजश्री प्रधानने शेअर केला बस स्टॉपवरील फोटो; म्हणाली ‘त्या जागी जाऊन पुन्हा एकदा…’

Tejashri Pradhan Post | अभिनेत्री तेजश्री प्रधान नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’, असे या मालिकेचे नाव आहे. त्यामध्ये तेजश्री प्रधानसह अभिनेता सुबोध भावे झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीने या मालिकेचा टीझर प्रदर्शित केला होता. यानंतर अनेकांची या मालिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
यानंतर तेजश्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. एका बसथांब्यावरील हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा बसथांबा तिच्या ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेत देखील पाहायला मिळाला होता. Tejashri Pradhan Post |
View this post on Instagram
हे फोटो शेअर करताना तेजश्रीने लिहिले की, “ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण केली, त्या जागी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या आठवणींना जाग आली. पुन्हा एकदा तुमच्या मनात तिची जागा निर्माण करण्यासाठी, एक नवीन पात्र, नव्या उमेदीनं जगण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वानंदी सरपोतदारला लवकरच भेटूयात. आशीर्वाद असू द्या”, असे म्हणत तेजश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावरुन हा बस स्टॉप तेजश्रीसाठी खूप खास असल्याचे समजत आहे. आता नव्या मालिकेची देखील तिने याच ठिकाणावरून सुरवात केल्याची माहिती समोर आली आहे. Tejashri Pradhan Post |
तेजश्रीच्या या पोस्टवर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी, ‘माझी खात्री आहे की, तू ही भूमिका उत्तम साकारशील. ऑल द बेस्ट’, अशी कमेंट करीत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. निवेदिता सराफ आणि तेजश्रीने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत एकत्र काम केले होते. Tejashri Pradhan Post |
हेही वाचा:
Sanjay Raut : मुख्यमंत्री नेभळट, डीप्युटी सीएम अर्धा दाढीवाला अन् दुबे….; संजय राऊतांची जहरी टीका




