तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे दिसणार एकत्र; पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली

Tejashree Pradhan and Subodh Bhave | अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे ही जोडी नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत होते. यातच आता तेजश्रीने चाहत्यांना एक बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर एकमेकांना टॅग करुन तेजश्री-सुबोधने त्यांच्या आधीच्या मालिकांची नावं वेगळ्या अंदाजात सांगितली.
तेजश्री-सुबोधने गेल्या वर्षी २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ सिनेमात काम केलं. यानंतर आता मालिकेत दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. तेजश्री – सुबोधने काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सुबोध भावेने पोस्टमध्ये,” होणार सून ‘ती’ ह्या घरची” तसेच “लवकरच” हे देखील कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ही पोस्ट सुबोध भावेने तेजश्रीला टॅग केले आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ ही तेजश्री प्रधानची गाजलेली मालिका होती. Tejashree Pradhan and Subodh Bhave |
View this post on Instagram
तर तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर एक पोस्ट करत, “तुला पाहते रे” तसेच तिने कॅप्शनमध्ये, “कोणाला पाहते माहीत आहे का? ” असे लिहून सुबोध भावेला टॅग केले आहे. या दोन्ही पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘तुला पाहते रे’ ही सुबोध भावेची गाजलेली मालिका होती. सुबोध-तेजश्रीने एकमेकांच्या मालिकांची वेगळ्या अंदाजात नावं घेतली. त्यामुळे त्यांच्या नवीन मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. Tejashree Pradhan and Subodh Bhave |
View this post on Instagram
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या आगामी मालिकेचे नाव अद्याप जाहीर झाले नाही आहे. मात्र अनेक वर्षांनंतर तेजश्री-सुबोधला मालिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. Tejashree Pradhan and Subodh Bhave |
हेही वाचा:
“…..हे पचनी पडत नाही”, “कितने आदमी थे” डायलॅागच्या दाव्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा





