तेजश्री प्रधानचा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय; ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री

Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. यातील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. मात्र आता तेजश्रीने मोठा निर्णय घेतला आहे. तिने ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काही दिवसांनी मुक्ताच्या भूमिकेत एक वेगळा चेहरा पाहायला मिळणार आहे.
परंतु तेजश्रीने मालिकाचा सोडण्याचा निर्णय का घेतला? हे अद्याप समोर आले नाही. तेजश्रीच्या जागी प्रेमाची गोष्ट मालिकेच मुक्ताच्या भूमिकेत कोण दिसणार? याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. यातच आता या भूमिकेत हिंदी मालिकेतील अभिनेत्री दिसणार आहे. अभिनेत्री स्वरदा ठिगळे प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीची जागा घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. Tejashree Pradhan |
View this post on Instagram
कोण आहे स्वरदा ठिगळे?
स्वरदा २०१३मध्ये ‘माझे मन तुझे झाले’ मालिकेतून इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मध्येही ती दिसली होती. मराठी मालिकेनंतर तिनं हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही नशीब आजमावलं. तिनं ‘प्यार के पापड’ ,‘सावित्री देवी कॉलेज’ अशा हिंदी मालिका केल्या. आता ती पुन्हा मराठी मालिकेत दिसणार आहे.
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. आपल्या अभियाने तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच ती ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या सिनेमात दिसली होती. यात अभिनेता सुबोध भावे तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा:





