अखेर ठरलं ! तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची मालिका ‘या’ दिवसापासून सुरु होणार

Tejashree Pradhan and Subodh Bhave | अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेची अपडेट समोर आली आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ अखेर जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय यात कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार आहे. याबाबतची माहिती देखील नव्या प्रोमोतून समोर आली आहे.
नव्या मालिकेत सुबोध आणि तेजश्री यांच्या पात्रांचे नाव समर आणि स्वानंदी आहे. दोघेही आपापल्या बहीण-भावांच्या आनंदासाठी लग्नबंधनात अडकणार आहेत. लेटेस्ट प्रोमोमध्ये भव्य महालात स्वानंदीचा भाऊ आणि समरची बहीण यांचा लग्नसोहळा सुरू आहे, त्याच मुहूर्तावर समर-स्वानंदीही लग्न करतात. Tejashree Pradhan and Subodh Bhave |
View this post on Instagram
या मालिकेत तेजश्री-सुबोध यांच्यासह पूर्णिमा डे, राज मोरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसंच किशोरी अंबिये, किशोर महाबोले, सुलभा आर्या हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारही ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये आहेत. Tejashree Pradhan and Subodh Bhave |
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका येत्या 11 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तेजश्री-सुबोधची मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता पाहता येईल. सध्या दोन्ही कलाकार एकत्र कमबॅक करत असल्याने या मालिकेबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. Tejashree Pradhan and Subodh Bhave |
हेही वाचा:
चीनकडून ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरु ; भारताचे टेन्शन वाढले





