बॉलिवुडमधील स्टार तापसी पन्नू ही चित्रपटात वेगवेगळ्या रोल्स साकारण्यासाठी ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटात भिन्न भूमिका यशस्वीपणे साकारल्या असून त्याला चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपूर्वीच तापसीने आपला बर्थ डे जल्लोषात साजरी केला होता. यानिमित्त चाहत्यांनीही तिला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या होत्या.
एका वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूच्या जन्मदिनानिमित्त आयोजीत एका खास कार्यक्रमात तिची तुलना कंगणासोबत केली होती. यावेळी बॉलिवूडमधील क्विन कंगना नसून तापसी पन्नूच असल्याचे म्हटले होते. यावर तापसीनेही एक खास ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. तापसी ने ट्वीट करत लिहिले की, “अरे अरे, असे म्हणून नका.
क्वीन तिलाच राहु द्या, नाही तर पुन्हा कॉपी केल्याचे म्हणतील. अभिनेत्री हिच माझीा खरी ओळख असून तुम्ही असेच माझ्यासोबत कायम रहा. धन्यवाद!, असे तिने म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कंगणाची बहिण रंगोली चंदेल हिने तापसी पन्नला कंगनाची “सस्ती कॉपी’ असे म्हटले होते.
वर्क फ्रंटबाबत सांगायचे म्हटल्यास 15 ऑगस्ट रोजी तापसीचा “मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा यासारखे स्टार कलाकार आहेत. याशिवाय ती “सांड की आँख’ चित्रपटातही झळकणार आहे. यात तिच्यासोबत भूमिका पेडणेकर काम करत आहे.