काबूल – अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारवर टीका केल्याबद्दल तालिबानने एका विद्यापिठातील प्रसिद्ध प्राध्यापकाला अटक केली आहे. फैजुल्ला जलाल असे या प्राध्यापकांचे नाव आहे. नागरिकांना सरकारविरोधी चिथावणी देणारी आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेशी खेळल्याबद्दल सोशल मीडियावर शेरेबाजी केल्याबद्दल तालिबानच्या गुप्तचर विभागाने त्यांना अटक केली आहे.
जलाल यांच्या कन्या हसिना जलाल यांनी एका ट्विटमधून आपल्या पित्याच्या सुटकेची मागणी केली आहे. आपल्या वडिलांच्या अटकेची बातमी ऐकून आपल्याला खूप दुःख झाले आहे. त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, असे हसिना यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जलाल यांच्या अटकेबोबत सरकारी पातळीवरून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जलाल यांच्या पत्नी मसूदा जलाल यांनी 2004 मध्ये तत्कालिन अध्यक्ष हमिद करझाई यांच्याविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.