मुंबई – सुजेन खानचा सिनेसृष्टीशी थेट संबंध नसला तरी ती मीडियामध्ये आजही चर्चेत असते. सुजेन अनेकदा तिचा मित्र अर्सलान गोनी याच्यासह वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेली पाहायला मिळते. या वेळीही अर्सलान गोनीसोबत ती एका बिर्थडे पार्टीला जाताना दिसून आली. उद्योजक बंटी सजदेहच्या पार्टीमध्ये सुजेननं अर्सलान गोनीसोबत हजेरी लावली.
मुंबईत पार पडलेल्या या पार्टीमध्ये सुजेन ज्यावेळी आली तेव्हा तिच्यासोबत आलेला अर्सलान गोनी देखील कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी सुजेनने शॉर्ट स्कर्ट घातला होता तर अर्सलाननं ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. एरवी दोघेही मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लपून छपून जातात परंतु यावेळी दोघेही कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसून आले.
View this post on Instagram
सुजेनचा हा लूक चाहत्यांना देखील चांगलाच आवडला आहे, अर्सलानसह तिला पाहून अनेकांनी तुम्ही बॉयफ्रेंड गिर्ल्फ्रेन्ड आहेत का,नवीन बॉयफ्रेंड का ? असा सवाल विचारला आहे. प्रसिद्धी झोतापासून लांब राहणाऱ्या जुनने पहिल्यांदाच इतक्या चांगल्या पद्धतीने मीडियासमोर फोटोसाठी अटेन्शन दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.