नवी दिल्ली – पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदु अधिकारी यांचे वडिल आणि बंधुंना केंद्र सरकारने व्हीआयपी दर्जाची म्हणजेच वाय प्लस सिक्युरिटी उपलब्ध करून दिली आहे.
सिसीर अधिकारी आणि दिव्येंदु अधिकारी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिसीर अधिकारी हे लोकसभेचे सदस्य आहेत तर दिव्येंदु अधिकारी हे तृणमुल कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी अजून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफवर सोपवण्यात आली आहे.
या दलाचे चार ते पाच सशस्त्र कमांडो त्यांच्या बरोबर कायम असणार आहेत. स्वत: सुवेंदु अधिकारी यांना झेडप्लस दर्जाची सुरक्षा केंद्राने पुरवली आहे. ते भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत.