हिंजवडी, (वार्ताहर) – सेवा कला व क्रीडा प्रतिष्ठान संचालित गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व स्पोर्ट्स अॅकॅडमी असोसिएट विथ सनफ्लॉवर पब्लिक स्कूल यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात झाला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र फेम प्रा. बालाजी जाधव, युवा उद्योजक शहाजी बारणे, शरदचंद्र धारूरकर, प्रा. विकास भोईर, व्याख्यात्या शारदाताई मुंडे, सत्यशोधक या चित्रपटाचे निर्माते प्रा. बाळासाहेब बांगर, अभिनेत्री सीता राय, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे, डॉक्टर द. ल. देशमुख उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सनफ्लावर पब्लिक स्कूलचे संस्थापक डॉ. शिवाजीराव बुचडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्तविक गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक अनिता घोटकुले यांनी केले.
या वेळी नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कलाविष्कार व नृत्य सादर करून आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड स्पोर्ट्स अॅकॅडमीचा भव्य असलेला कॅम्पस हा पालकांच्या व बालकांच्या उपस्थितीने गजबूजून गेला होता.