राहुरी – प्रेरणा मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक सुजित वाबळे यांची, तर उपाध्यक्षपदी प्रा. वेणूनाथ दामोदर लांबे यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक एच. डी. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
मल्टीस्टेट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतिपथावर कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रेरणा विकास कार्यकारी सोसायटी व प्रेरणा ग्रामीण पतसंस्था या दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळात गतवर्षी युवकांना 50 टक्के प्रतिनिधीत्व देण्याचे धोरण अवलंबलेले आहे.
प्रेरणा मल्टीस्टेटच्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतही याच धोरणांची अंमलबजावणी करण्यात आली. सहकार क्षेत्रात नव्याने युवावर्ग आकर्षित होण्यासाठी संस्थेने हे धोरण अवलंबले आहे. नवीन संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. प्रेरणा परिवार संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे, संचालक विष्णुपंत वर्पे, दादासाहेब उर्हे ,रवींद्र राऊत, प्रा. नंदकुमार दिघे, श्रीकांत खर्डे, राजेंद्र वर्पे, प्रा. विशाल वाबळे, अक्षय ओहळ, डॉ. दीपा कुसळकर, सुरेखा लवांडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.