अवसरी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या विहिरीत शेजारुन गेलेल्या गटाराचे पाणी पाझरत असल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले होते. ग्रामपंचायतीने गटारातील तुंबलेले पाणी जेसीबीच्या सहाय्याने मोकळे करुन विहिरीत पाझरुन येणारे दुर्गधींयुक्त पाणी बंद केले आहे. अवसरी खुर्द येथील मराठी शाळा क्रमांक एकच्या आवारातील विहिरीत गटाराचे पाणी पाझरत होते.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत टेमकर, उद्योजक प्रशांत अभंग, शांताराम अभंग, कल्याण टेमकर, हभप धोंडीभाऊ महाराज शिंदे, नामदेव कराळे, प्रवीण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कराळे यांसह ग्रामस्थांनी विहिरीत पाझरणाऱ्या पाण्याची पाहणी केली. यावेळी सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच मल्हारी वायाळ, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.