पुणे – रेल्वेच्या सोलापूर विभागातील भाळवणी आणि भिगवण स्थानकांदरम्यान सुरू असणाऱ्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यामुळे शुक्रवारपासून (12 मार्च) 31 मार्चपर्यंत पुणे-सोलापूर-पुणे विशेष गाडी रद्द केली आहे. तर, काही गाड्या अन्य स्थानकांमार्गे वळविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भाळवणी आणि भिगवण स्थानकांदरम्यान 31 मार्चपर्यंत दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे विशेष गाड्या रद्द केल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात येणार आहेत.
12 ते 30 मार्चपर्यंत विशाखापट्टणम-एलटीटी विशेष, 14 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत एलटीटी-विशाखापट्टणम विशेष, 12 ते 31 मार्चपर्यंत पुणे-सोलापूर-पुणे विशेष, 15 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत पनवेल-हजूर साहिब नांदेड विशेष, 14 ते 31 मार्चपर्यंत हजूर साहिब नांदेड-पनवेल विशेष या गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या गाड्यांच्या मार्गात बदल
12 ते 31 मार्चपर्यंत नागरकोइल-सीएसएमटी विशेष, 13 ते 31 मार्चपर्यंत सीएसएमटी-नागरकोइल विशेष, 12 ते 29 मार्चपर्यंत सीएसएमटी-नागरकोइल विशेष (द्विसाप्ताहिक), 14 मार्च ते 29 मार्चपर्यंत नागरकोइल-सीएसएमटी विशेष (द्विसाप्ताहिक) या गाड्या वळविण्यात येणार आहेत.