लाखणगांव – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक-गणेशनगर येथील पीरसाहेब यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. फक्त धार्मिक विधी करून भाविकांनी दर्शन घेतले,अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. देशभरात कोरोनाची दहशत असताना शासनाने जमावबंदी लागू केल्याने सर्वत्र यात्रा उत्सव बंद असल्याने गणेशनगर येथील पिरसाहेब यात्रा दरवर्षीप्रमाणे साजरा झाला नाही.
दरवर्षी मोठ्या उत्साहात पिरसाहेब यात्रा उत्सव साजरा होतो. यावेळी तीन ते चार तमाशांचे आयोजन केले जाते; परंतु यावर्षी यात्रा कमिटीने तमाशाच्या करमणुकीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. यात्रा-जत्रा बंद असल्याने सर्व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. करोनाशी सामना करण्यासाठी जमावबंदीचे काटेकोर पालन ग्रामस्थ करीत आहेत.