IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराटचा सर्वात मोठा विक्रम; बर्मिंगहॅममध्ये लिहिला नवा इतिहास!

Shubman Gill surpasses Virat Kohli’s record : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल एका वेगळ्याच लयीत दिसत असून धावांचा पाऊस पाडतोय. त्याने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकताना इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्यामुळेच पहिल्या दिवशी भारतीय संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला. यानंतर दुसऱ्या दिवशीही गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि १५० धावांचा टप्पा पार करत विराट कोहलीला मागे टाकत इतिहास रचला आहे.
शुबमन गिलने मोडला विराट कोहलीचा विक्रम –
गिलने दुसऱ्या दिवशी १५० धावां पूर्ण कसोटी क्रिकेटमध्ये नवा पराक्रम केला आहे. यासह तो बर्मिंगहॅमच्या मैदानावर सर्वात मोठी कसोटी खेळी खेळणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी कोहलीने २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमच्या मैदानावर १४९ धावांची खेळी साकारली होती. गिल आता बर्मिंगहॅमच्या मैदानावर १५० धावांची कसोटी खेळी करणारा पहिला भारतीय बनला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला हे जमले नव्हते.
कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर दमदार कामगिरी-
Lunch on Day 2 in Edgbaston 🍱
109 runs in the first session for #TeamIndia 🙌
Captain Shubman Gill unbeaten on 168* 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/GKubv4hIh9
— BCCI (@BCCI) July 3, 2025
शुबमन गिलने २०२० मध्ये भारतीय कसोटी संघासाठी पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत महत्त्वाचा दुवा बनला आहे. त्याने भारतीय संघासाठी सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे. सध्या विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर तो चौथ्या क्रमांकावर खेळत आहे आणि या स्थानावर त्याने सलग दोन शतके ठोकली आहेत. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी ३४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २१६३ धावा केल्या आहेत, ज्यात ७ शतके आणि तितक्याच अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा – SL vs BAN : लाइव्ह सामन्यात ७ फूट लांब सापाचा थरार, VIDEO होतोय व्हायरल
सलग दोन कसोटीत ठोकली शतके –
कर्णधार शुबमन गिलने मागील सामन्यात १४७ धावांची खणखणीत खेळी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची दमछाक केली. कसोटी कर्णधार बनल्यापासून त्याच्या फलंदाजीत नवीन चमक दिसत आहे. इंग्लंड दौऱ्यावर तो संघासाठी संकटमोचक ठरला आहे.दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
हेही वाचा – Mohammed Shami : ‘शमीला अहंकार; मुलीशी संपर्क नाही!’, हसीन जहांची मोहम्मद शमीवर पुन्हा टीका
मागील सामन्यात शतक ठोकणारा केएल राहुल यावेळी मोठी खेळी करू शकला नाही आणि अवघ्या २ धावांवर बाद झाला. त्यानंतर करुण नायरने ३१ धावा केल्या. पण यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने जबाबदारी सांभाळली. जैस्वाल ८७ धावांवर बाद झाला. दुसरीकडे, गिलने शानदार नाबाद १५० करत संघाची धावसंख्या ४०० च्या पुढे नेण्यात रवींद्र जडेजासह मोलाची भूमिका बजावली.





