Rekha Patra : भाजप आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर उपचार सुरू
Rekha Patra : पश्चिम बंगालमधील भाजपच्या हिंगलगंज मतदारसंघाच्या आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कोलकात्यातील आर. एन. टागोर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Rekha Patra : पश्चिम बंगालमधील भाजपच्या हिंगलगंज मतदारसंघाच्या आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कोलकात्यातील आर. एन. टागोर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री शारदावत मुखर्जी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Rekha Patra)
प्रकृती खालावल्याने कोलकात्यात हलवले
मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी रेखा पात्रा या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज येथील निवासस्थानी अचानक आजारी पडल्या. त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना बसीरहाट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. (Rekha Patra)
तेथे सुमारे चार तास उपचार करूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी कोलकात्यातील आर. एन. टागोर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. (Rekha Patra)
आरोग्यमंत्र्यांची रुग्णालयात भेट
पश्चिम बंगालचे आरोग्यमंत्री शारदावत मुखर्जी यांनी रविवारी सकाळी रुग्णालयाला भेट देऊन रेखा पात्रा यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. (Rekha Patra)
संदेशखाली आंदोलनामुळे चर्चेत आल्या होत्या
रेखा पात्रा या २०२४ मध्ये संदेशखाली आंदोलनादरम्यान चर्चेत आल्या होत्या. महिलांवरील कथित अत्याचार, जमीन बळकावणे आणि खंडणीच्या आरोपांवरून तत्कालीन तृणमूल काँग्रेस नेते शेख शाहजहान यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Rekha Patra)
भाजपने त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसीरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हिंगलगंज मतदारसंघातून विजय मिळवत आमदारकी मिळवली. (Rekha Patra)
Rekha Gupta : दिल्ली उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना मोठा दिलासा




