IND vs ENG : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये जलवा! सलग दोन कसोटीत शतकं ठोकत रचला इतिहास

IND vs ENG Shubman Gill Creates History : शुबमन गिलने बुधवारी (२ जुलै) एजबॅस्टन कसोटीत अनेक विक्रमांची रांग लावत इतिहास रचला. तो इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या परदेशी कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे, असे करणारा तो केवळ दुसरा भारतीय कर्णधार आहे. या खास क्लबमध्ये डॉन ब्रॅडमन, गारफील्ड सोबर्स आणि ग्रीम स्मिथ यांसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.
शुबमन गिलने लावली विक्रमांची रांग –
इंग्लंडमध्ये पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणाऱ्या प्रसिद्ध परदेशी कर्णधारांमध्ये ब्रॅडमन (१९३८), सोबर्स (१९६६), मोहम्मद अझरुद्दीन (१९९०) आणि आता शुबमन गिल (२०२५) यांचा समावेश आहे. तसेच गिलने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावून एक खास विक्रम नोंदवला आहे. हा पराक्रम करणारा तो फक्त चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे.
गिलला कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी –
Stumps on the opening day of the 2nd Test 🏟️#TeamIndia finish Day 1 with 310/5 on board 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/hzMC3Befky
— BCCI (@BCCI) July 2, 2025
यादीत विराट कोहली (ज्यांनी कर्णधार म्हणून पहिल्या २ कसोटी सामन्यांत ३ शतके ठोकली), विजय हजारे, सुनील गावस्कर आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे. जर गिल आणखी एक शतक झळकावले, तर तो कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. कोहलीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून अॅडिलेड कसोटीत दोन्ही डावांत शतके आणि सिडनी कसोटीत पहिल्या डावात शतक ठोकले होते.
२५ वर्षीय शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळताना अप्रतिम कामगिरी केली आहे. हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटी सामन्यात १४७ धावांची खणखणीत खेळी साकारल्यानंतर, त्याने एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाबाद ११४ धावा कुटल्या. भारतीय संघ संकटात सापडलेला असताना, त्याच्या या खेळीने भारताला पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३१० अशी मजबूत धावसंख्या उभारुन दिली.
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वालचा स्टोक्सला टोला; शतक हुकलं, पण चर्चा तुफान
गिल असा पराक्रम करणारा भारताचा चौथा कर्णधार बनला –
शुबमन गिल आता भारताचा असा चौथा कर्णधार बनला आहे, ज्यानी कर्णधारपदाच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावले आहे. यापूर्वी हा पराक्रम विराट कोहली, विजय हजारे आणि सुनील गावस्कर यांनी केला होता. याशिवाय, गिल एजबॅस्टन येथे शतक झळकावणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला (यापूर्वी विराट कोहली) आणि तिथे ५० हून धावा करणारा तिसरा भारतीय कर्णधार (महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासह) आहे.





