Shreyas Iyer Fine : विजयानंतरही पंजाब किंग्जला बसला मोठा झटका! कर्णधार श्रेयस अय्यरवर बीसीसीआयची कारवाई, नेमकं कारण काय?
Shreyas Iyer Fine : पहिल्या सामन्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच कर्णधार श्रेयस अय्यर याला बीसीसीआयने मोठा दणका दिला आहे.

Shreyas Iyer Fine IPL 2026 Slow Over Rate : आयपीएल २०२६ च्या रोमांचक प्रवासात पंजाब किंग्ज संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले आहे. मुल्लानपूरच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात पंजाबने ३ गडी राखून बाजी मारली असली, तरी विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच कर्णधार श्रेयस अय्यरला बीसीसीआयने मोठा दणका दिला आहे.
आयपीएल २०२६ च्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर मात करत दमदार सुरुवात केली. मात्र, या विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. स्लो ओव्हर रेटमुळे (Slow Over Rate) कर्णधार श्रेयस अय्यरवर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे कलम २.२२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय? Shreyas Iyer Fine
🚨 Shreyas Iyer slapped with a ₹12 lakh fine for slow over-rate 🏏#shreyasiyer #punjabkings #ipl2026 #t20 #t20cricket #golden444 #golden444india pic.twitter.com/gcxXNUtmin
— Golden444official (@Golden444sports) April 1, 2026
मुल्लानपूर येथील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात पंजाबचा संघ वेळेत २० वे षटक सुरू करू शकला नव्हता. यामुळे नियमानुसार शेवटच्या षटकात पाच ऐवजी केवळ चार खेळाडूंनाच ३० यार्डच्या वर्तुळाबाहेर ठेवण्याची परवानगी मिळाली. श्रेयस अय्यरने या हंगामात केलेली ही पहिलीच चूक असल्याने त्याला १२ लाखांचा दंड झाला आहे. जर हीच चूक पुन्हा झाली, तर हा दंड २४ लाखांवर जाईल आणि तिसऱ्यांदा चूक झाल्यास एका सामन्याची बंदीही येऊ शकते.
कुपर कॉनोलीचा १०३ मीटर लांब ‘मॅजिक’ सिक्स! Shreyas Iyer Fine
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सला १६२ धावांपर्यंत रोखण्यात पंजाबच्या गोलंदाजांना यश आले. गुजरातकडून शुबमन गिलने ३९ तर जोस बटलरने ३८ धावा केल्या. १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात डळमळीत झाली होती, पण कुपर कॉनोलीने नाबाद ७२ धावांची वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा – Anil Gurav : क्रीडा विश्वावर शोककळा ! दिग्गज क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन
कुपर कॉनोलीने राशिद खानच्या गोलंदाजीवर मारलेला १०३ मीटर लांब षटकार या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरला. पंजाबने ३ गडी राखून हा सामना जिंकला असला, तरी श्रेयस अय्यरवरील दंडामुळे संघाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.





