Shreyas Iyer Captaincy : श्रेयस अय्यर: भारताचा ‘मिडल ऑर्डर’ किंग अन् आयपीएलचा यशस्वी ‘सरपंच’
Shreyas Iyer Captaincy : श्रेयस अय्यरने आयपीएल 2026 मध्ये दमदार फलंदाजी आणि अचूक नेतृत्वाच्या जोरावर पंजाब किंग्सला अव्वल स्थानी पोहोचवत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

आयपीएलच्या प्रत्येक हंगामात एखादा खेळाडू चर्चेच्या केंद्रस्थानी असतो, पण २०२६ चा हा हंगाम पूर्णपणे ‘श्रेयस अय्यर’ या नावाभोवती फिरताना दिसत आहे. एकेकाळी ‘शॉर्ट बॉल’ आणि ‘वारंवार होणाऱ्या दुखापती’ यांमुळे कारकीर्द धोक्यात असल्याचे बोलले जाणाऱ्या श्रेयसने यंदा अशा काही खेळी केल्या आहेत की, टीकाकारांना आता आपली मते बदलणे भाग पडले आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून त्याने ज्या प्रकारे संघाला गुणतालिकेत अव्वल स्थानी नेऊन ठेवले आहे, ते पाहून भारतीय क्रिकेटचे भविष्यातील नेतृत्व सुरक्षित हातांत असल्याची खात्री पटते.
पंजाब किंग्सचा नवा चेहरा अन् दमदार वाटचाल –
पंजाब किंग्स हा असा एक संघ होता जो अनेक वर्षे केवळ ‘सहभागासाठी’ खेळतो की काय, अशी शंका यायची. पण आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची धुरा हाती घेताच या संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. रिकी पाँटिंग यांच्यासारख्या आक्रमक प्रशिक्षकासोबत श्रेयसची जोडी कमालीची यशस्वी ठरली आहे. पंजाबने यंदा एकामागून एक विजय मिळवत जो विक्रम केला आहे, त्यामागे श्रेयसची मैदानावरची अचूक रणनीती कारणीभूत आहे. विशेषतः अर्शदीप सिंग आणि झेव्हियर बार्टलेट यांसारख्या गोलंदाजांचा त्याने ज्या प्रकारे कठीण षटकांत वापर केला, ते त्याच्या प्रगल्भ नेतृत्वाचे लक्षण आहे. चालू हंगामातील 8 सामन्यापेकी श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली पंजाबने ६ जिंकले असून एकात राजस्थानविरुद्ध पराभव आणि एक रद्द झाला आहे.
Setting the tone in Amdavad 📍🔥 pic.twitter.com/5HmxZ11FUu
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 2, 2026
‘शॉर्ट बॉल’ आणि ‘ट्रिगर’ झालेला श्रेयस –
श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीत त्याच्यावर सर्वात जास्त टीका झाली ती म्हणजे त्याला उसळते चेंडू (Bouncers) खेळता येत नाहीत. प्रतिस्पर्धी संघ नेहमीच त्याला शॉर्ट बॉल टाकून बाद करण्याची रणनीती आखायचे. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयसने ही रणनीती धुळीस मिळवली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने जसप्रीत बुमराहच्या ताशी १४५ किमी वेगाच्या शॉर्ट बॉलवर ज्या प्रकारे ‘पुल शॉट’ मारून षटकार खेचला, तो या हंगामातील सर्वात मोठा ‘स्टेटमेंट’ देणारा फटका ठरला. यासह त्याने 35 चेंडूत 66 धावांची वादळी खेळी साकारली होती.
Batting On Top,🔥
Captaincy On Top,🔥
Fielding On Top,🔥One Word For This Man – SHREYAS IYER 👑🐐⚜️ pic.twitter.com/skjdUptwO2
— Shreyass Eraa (@IyerShreyass) April 17, 2026
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयस म्हणाला होता की, “जेव्हा लोक माझ्या उणिवांवर वारंवार चर्चा करतात, तेव्हा मी आतून ‘ट्रिगर’ होतो.” हेच ‘ट्रिगर’ होणे श्रेयससाठी सकारात्मक ठरले आहे. त्याने थ्रो-डाउन स्पेशालिस्टच्या मदतीने तासनतास शॉर्ट चेंडूंचा सराव करून आपली उणीव शक्तीमध्ये बदलली आहे. श्रेयसने यंदा ज्या प्रकारे शॉर्ट बॉलची भीती मनातून काढून टाकली आहे, ते पाहून तो आगामी काळात तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात मोठा मॅच-विनर ठरेल यात शंका नाही.
ज्याला हात लावेल, त्याचं सोनं –
𝐀𝐮𝐫𝐚 𝐟𝐞𝐥𝐭 𝐚𝐜𝐫𝐨𝐬𝐬 𝐭𝐡𝐞 𝐠𝐥𝐨𝐛𝐞 🌍🥶 pic.twitter.com/Qm9zmU3FU9
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 1, 2026
श्रेयस अय्यर हा आयपीएल इतिहासातील असा एकमेव कर्णधार ठरला आहे, ज्याने तीन वेगवेगळ्या संघांना (दिल्ली, केकेआर आणि आता पंजाब) यशाच्या शिखरावर नेले आहे. त्याने केकेआरचे नेतृत्व करताना 2024 मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसेच दिल्लीनंतर त्याने पंजाबलाही एकदा फायनलमध्ये पोहोचवले आहे. त्याच्या नेतृत्वात एक प्रकारची लवचिकता आहे. तो खेळाडूंवर विश्वास दाखवतो आणि त्यांना मैदानात व्यक्त होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो. रिंकू सिंग किंवा प्रभसिमरन सिंग सारख्या युवा खेळाडूंनी त्याच्या नेतृत्वात ज्या प्रकारे आपली चमक दाखवली, त्याचे श्रेय श्रेयसच्या ‘मॅन मॅनेजमेंट’ कौशल्याला जाते.
दुखापतीतून फिनिक्ससारखी झेप –
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 29, 2026
श्रेयसचा हा प्रवास केवळ मैदानावरचा नाही, तर तो मानसिक खंबीरतेचाही आहे. पाठीच्या गंभीर शस्त्रक्रियेनंतर जेव्हा तो बेडवर होता, तेव्हा त्याने योगाभ्यास आणि ‘माइंडफुलनेस’च्या जोडीने स्वतःला सावरले. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्याच वेगाने धावणे आणि सीमारेषेवर चित्तथरारक झेल घेणे हे श्रेयसच्या जिद्दीचे प्रतीक आहे. हार्दिक पांड्याचा एक अशक्य वाटणारा झेल त्याने ज्या सफाईने टिपला, त्याने सामन्याचे पारडेच बदलले होते. श्रेयसच्या सध्याच्या फॉर्ममुळे त्याला पुन्हा एकदा भारताच्या टी२० संघात नियमित स्थान मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माजी खेळाडू आणि तज्ज्ञांच्या मते, श्रेयससारखा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचे सर्वात मोठे अस्त्र ठरू शकतो.
पंजाबचा ‘किंग’ मेकर सरपंच –
On top. Still unbeaten. We move. 😎🔥 pic.twitter.com/jW3k59zCKK
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 16, 2026
श्रेयस अय्यरसाठी हा हंगाम केवळ एका ट्रॉफीसाठी नाही, तर हरवलेला सन्मान आणि भारतीय संघातील हक्काचे स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आहे. पंजाबचा हा ‘सरपंच’ आता केवळ गावापुरता किंवा एका फ्रँचायझीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण क्रिकेट विश्वावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यरने आपल्या बॅटने आणि नेतृत्वाने हे सिद्ध केले आहे की, खेळाडू केवळ धावांमुळे मोठा होत नाही, तर तो आपल्या जिद्दीने आणि टीकाकारांना दिलेल्या उत्तरांमुळे महान ठरतो. पंजाबचा हा ‘सरपंच’ यंदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर करणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
– विकास मुढे





