Head Wins Medal : ट्रॅव्हिस हेडच ठरला ऑस्ट्रेलियाचा ‘किंग’! स्टार्क अन् ॲलेक्स कॅरीला मागे टाकत सलग दुसऱ्यांदा जिंकला ‘हा’ खास पुरस्कार
Head Wins Medal : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने सलग दुसऱ्या वर्षी 'ॲलन बॉर्डर मेडल' पटकावले आहे.

Travis Head Wins Allan Border Medal Australia Annual Cricket Awards : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Cricket Australia) वतीने ७ ऑगस्ट रोजी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारांची (Annual Cricket Awards) अधिकृत घोषणा करण्यात आली. यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ॲशेस २०२५-२६ (Ashes 2025-26) मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचा पुरुषांमधील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा ‘ॲलन बॉर्डर मेडल’ (Allan Border Medal) पटकावला आहे. या शर्यतीत त्याने मिचेल स्टार्क आणि ॲलेक्स कॅरी यांना मागे टाकले.
खास क्लबमध्ये हेडचा समावेश!
सलग दुसऱ्यांदा ॲलन बॉर्डर मेडल जिंकताच ट्रॅव्हिस हेड एका विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा हा मेडल जिंकणारा तो सहावा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. याआधी रिकी पॉन्टिंग, मायकल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सर्वाधिक ४ वेळा, डेव्हिड वॉर्नरने ३ वेळा तर शेन वॉट्सनने २ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. हेडने
A little bit different from last year 😂
The moment Travis Head won his second Allan Border Medal at the #AusCricketAwards pic.twitter.com/x9cjgz6bSM
— cricket.com.au (@cricketcomau) August 7, 2026
ॲशेस मालिकेत तब्बल ६२९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये पर्थ येथील आव्हानात्मक धावांचा पाठलाग करताना त्याने साकारलेल्या १२३ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
पुरस्कार जिंकल्यानंतर हेड म्हणाला, “मिचेल स्टार्क आणि ॲलेक्स कॅरी यांच्यासाठी हे वर्ष अप्रतिम राहिल्याने स्टार्क हा पुरस्कार जिंकेल असे मला वाटले होते. मी अगदी सहज आलो होतो आणि हा सन्मान मिळेल अशी अपेक्षा नव्हती.”
मिचेल स्टार्क ‘टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’!
Back-to-back 👑
Travis Head wins his second straight Allan Border Medal, with Mitchell Starc, Mitch Marsh and Tim David winning the Test, ODI and T20I Men’s Players of the Year. pic.twitter.com/G9OC0daUCd
— Cricket Australia (@CricketAus) August 7, 2026
इतर महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये मिचेल स्टार्कला ‘टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’, तर ३०४ धावा करणाऱ्या मिचेल मार्शला ‘वनडे प्लेयर ऑफ द इयर’ घोषित करण्यात आले. तसेच टी-२० मध्ये ३९५ धावा करणाऱ्या टिम डेव्हिडने ‘टी-२० प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियन संघ आता १३ ऑगस्टपासून डार्विन येथे बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.





