Rajasthan Royals Ownership : मोठी बातमी! राजस्थान रॉयल्सची मालकी पुन्हा बदलली; ‘या’ व्यक्तीने १५, ६६० कोटींमध्ये खरेदी केला संघ
Rajasthan Royals Ownership : या घोषणेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले, कारण पूर्वी असे मानले जात होते की नवीन मालक अमेरिकन उद्योगपती कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील एक गट आहे, ज्यामध्ये रॉब वॉल्टन आणि फोर्ड कुटुंबातील सदस्यांचाही समावेश होता.

Lakshmi Mittal Rajasthan Royals New Owner : आयपीएलच्या वर्तुळात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. स्टील उद्योग क्षेत्रातील जागतिक दिग्गज उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी राजस्थान रॉयल्स या लोकप्रिय फ्रँचायजीच्या अधिग्रहणाचा मोठा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक करारामुळे क्रिकेट आणि व्यावसायिक जगतात प्रचंड चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे या मेगा-डिलचे गणित?
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन उद्योगपती कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील एक गटाने माघार घेतल्यानंतर हा करार झाला. ब्रिटेनमध्ये स्थायिक असलेले भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी जयपुरस्थित राजस्थान रॉयल्सला खरेदी करण्यासाठी अंतिम करार पूर्ण केला आहे. हा भव्य सौदा तब्बल १.६५ अब्ज डॉलर (अंदाजे १५,६६० कोटी रुपये) एवढ्या विक्रमी रकमेत झाला आहे. या कंसोर्टियममध्ये प्रसिद्ध उद्योजक अदार पूनावाला आणि राजस्थान रॉयल्सचे विद्यमान सह-मालक मनोज बदाले यांचाही समावेश आहे.
मनोज बदालेच करत राहणार मार्गदर्शन –
Big news for the Rajasthan Royals
Lakshmi Mittal and Adar Poonawalla.
Aditya Mittal will lead on behalf of the Mittal family makes it even better his global experience across business, EPL & NBA ecosystems will be invaluable for the IPL pic.twitter.com/piOurOLPm1
— BlueGreen Planet (@De_le_Vega) May 3, 2026
क्रिकबजच्या अहवालानुसार, या नवीन संरचनेत मित्तल कुटुंबाकडे संघाची मुख्य मालकी आणि नियंत्रण असणार आहे. त्यांच्याकडे तब्बल ७५ टक्के हिस्सा असेल, तर अदार पूनावाला यांच्याकडे १८ टक्के भागीदारी असणार आहे. उर्वरित ७ टक्के हिस्सा पूर्वीप्रमाणेच मनोज बदाले यांच्या विद्यमान गुंतवणूकदारांकडे कायम राहणार आहे. विशेष म्हणजे, मनोज बदाले संघासोबत जोडलेले राहून फ्रँचायझीचे मार्गदर्शन करत राहतील. या संपूर्ण अधिग्रहणामध्ये पार्ल रॉयल्स आणि बारबाडोस रॉयल्स या परदेशी संघांचाही समावेश आहे.
भावनिक नाते आणि भविष्यातील आव्हान –
🚨 BREAKING
Lakshmi Mittal has announced the acquisition of Rajasthan Royals franchise.
Adar Poonawalla and Manoj Badale are part of the consortium that has acquired the franchise for $1.65 billion. pic.twitter.com/MiZ5piwzrP
— Cricbuzz (@cricbuzz) May 3, 2026
लक्ष्मी मित्तल यांचा राजस्थानशी खूप जुना आणि भावनिक संबंध आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील सादुलपुर गावात झाला होता. याबद्दल बोलताना मित्तल यांनी सांगितले की, “माझा परिवार राजस्थानशी जोडलेला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये मला राजस्थान रॉयल्सपेक्षा अधिक कोणतीही टीम आवडली नसती.”
संघ मालकीचा करार कधी होणार पूर्ण –
सध्याच्या आयपीएल २०२६ हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत आहे. तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या दमदार कामगिरीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तथापि, हा करार पूर्ण होण्यासाठी बीसीसीआय, (CCI) आणि आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या अंतिम मंजुरीची आवश्यकता आहे, जी २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत मिळण्याची अपेक्षा आहे. या मोठ्या गुंतवणुकीनंतर राजस्थान रॉयल्सच्या इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचे मानले जात आहे.





