Hamza Nazar Ban : पीसीबीचा मोठा दणका! ‘या’ स्टार खेळाडूवर २ वर्षांची बंदी अन् १० लाखांचा दंड; अनधिकृत लीग खेळणाऱ्यांवरही टांगती तलवार
Hamza Nazar Ban : व्हिसा अर्ज प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणारी आणि अपूर्ण माहिती दिल्याचा ठपका ठेवत पीसीबीने त्याच्यावर ही कडक कारवाई केली आहे.

PCB Bans Hamza Nazar For Two Years Visa Frauds Misleading Information Fines PKR 10 Lakh : पीसीबीने एका धक्कादायक कारवाईत ऑलराउंडर खेळाडू हमजा नझरवर (Hamza Nazar) दोन वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली आहे. व्हिसा अर्ज प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणारी आणि अपूर्ण माहिती दिल्याचा ठपका ठेवत पीसीबीने त्याच्यावर ही कडक कारवाई केली आहे. याशिवाय त्याला १० लाख पाकिस्तानी रुपयांचा (PKR 10 Lakh) दंडही ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे हमजा नझरचे पाकिस्तान राष्ट्रीय संघात खेळण्याचे स्वप्न आणखी धुळीस मिळाले आहे.
व्हिसा अर्जात लपवली माहिती; तीन सदस्यीय समितीची चौकशी!
पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट बोर्डामार्फत व्हिसासाठी अर्ज करताना हमजा नझरने दिलेली माहिती अचूक आणि खरी नव्हती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पीसीबीने तीन सदस्यीय विशेष समिती स्थापन केली होती. चौकशीदरम्यान हमजा नझरने महत्त्वाचे तथ्य लपवून दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचे उघड झाले. समितीने खेळाडूला आपले पक्ष मांडण्याची पूर्ण संधी दिल्यानंतर सर्व पुराव्यांची पाहणी करून बोर्डाला अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे पीसीबीने हे शिस्तभंगाचे मोठे पाऊल उचलले.
अनधिकृत लीग खेळणाऱ्या खेळाडूंनाही बंदीचा इशारा!
Breaking News🚨
PCB Bans Hamza Nazar for Two Years
– The PCB has imposed a 2-year ban on domestic cricketer Hamza Nazar and fined him PKR 1 million.
– The action was taken after he was found guilty of providing false and incomplete information in his visa application.
– As a… pic.twitter.com/Oc6RIkn6II
— Ahmad Raza (@AhmadRzTLY) August 6, 2026
आपल्या अधिकृत निवेदनात पीसीबीने स्पष्ट केले की, चुकीची माहिती देणे किंवा बोर्डाची बदनामी करणे अजिबात सहन केले जाणार नाही. तसेच, झांबियातील लुसाका येथे पार पडलेल्या ‘एशियन लेजेंड्स’ या अनधिकृत (Unauthorized) स्पर्धेत सहभागी झालेल्या पूर्व खेळाडूंवरही पीसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे.
माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानसह या स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंवर २ वर्षांची बंदी येऊ शकते. अशा खेळाडूंना पीसीबीशी संबंधित कोणतीही स्पर्धा, कोचिंग, मेंटॉरशिप किंवा पीएसएलमध्ये (PSL) दोन वर्षांसाठी काम करण्यास मनाई केली जाईल.





