SRH vs KKR : केकेआरने साधली विजयांची हॅट्ट्रिक! सलग पाच विजयानंतर हैदराबादचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
SRH vs KKR : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने यजमानांचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला.

SRH vs KKR Kolkata Knight Riders third consecutive victory : आयपीएल २०२६ च्या ४५व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सनी दारुण पराभव करत शानदार विजय नोंदवला आहे. या विजयासह सनरायझर्स हैदराबादच्या सलग ५ विजयांचा सिलसिला खंडीत झाला आहे, तर दुसरीकडे केकेआरने सलग तिसरा विजय मिळवत विजयाची हॅट्रिक साजरी केली आहे. पहिल्या सहा सामन्यांत एकही विजय मिळवू न शकलेल्या केकेआरने आता दमदार पुनरागमन केले आहे.
सनरायझर्स हैदराबादचा डाव गडगडला –
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात आश्वासक झाली होती. मात्र, त्यानंतर फलंदाजांनी एक-एक करून विकेट्स गमावल्या. हैदराबादचा डाव १९ षटकांत १६५ धावांवर आटोपला. सलामीवीर अभिषेक शर्मा १५ धावांवर बाद झाल्यानंतर, ट्रॅव्हिस हेडने २८ चेंडूंत आक्रमक ६१ धावांची खेळी करत इशान किशनसोबत अवघ्या ८.५ षटकांत १०५ धावांची भागीदारी उभारली.
Travis Head on a roll 🤸
Back to back fifties for the #SRH opener, this one off only 22 balls 🔥
Updates ▶️ https://t.co/muersQO7at#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvKKR pic.twitter.com/aMZNLZ8HvE
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2026
पण हेड बाद झाल्यानंतर हैदराबादची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. संघाने आपल्या शेवटच्या ९ विकेट्स अवघ्या ६० धावांत गमावल्या. केकेआरकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. याव्यतिरिक्त वैभव अरोरा, कॅमरुन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांना प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
केकेआरचा सहज पाठलाग –
5️⃣0️⃣ UP!
Angkrish Raghuvanshi with a steady half century, inching #KKR closer 👏
Updates ▶️ https://t.co/muersQO7at#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvKKR pic.twitter.com/os23Ll7zNX
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2026
प्रत्युत्तरात १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात धडाकेबाज झाली. फिन ॲलनने १३ चेंडूंत २९ धावांची आक्रमक खेळी केली, पण त्याला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी संयमी फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. रहाणेने ३६ चेंडूंत ४३ तर रघुवंशीने ४७ चेंडूंत ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने ११ चेंडूंत नाबाद २२ धावा फटकावून केकेआरला १८.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात विजयापर्यंत पोहोचवले. या विजयामुळे केकेआरच्या प्ले-ऑफमधील आशा पल्लवित झाल्या आहेत.





