पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात ठिकठिकाणी असलेल्या शिवमंदिरांमध्ये शुक्रवारी शिवरात्री साजरी करण्यात आली. दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. शहरात ओंकारेश्वर, मुठेश्वर, पांचाळेश्वर, पाताळेश्वर, सोमेश्वर, तारकेश्वर, हरिहरेश्वर यांसह शहरातील विविध मंदिरांमध्ये पूजा बांधण्यात आली. तसेच मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तसेच फुलांची आरासही करण्यात आली होती.
पुणे शहरात अनेक ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत. प्रामुख्याने सर्व मंदिरे ही मुख्य पेठांमध्ये आहेत. याशिवाय पुणे परिसरातही अनेक जुनी मंदिरे आहेत. त्यामध्ये सोमेश्वर वाडीचे सोमेश्वर मंदिर, भीमाशंकर, बनेश्वर आदी मंदिरांमध्येही पुण्यातून आणि आजूबाजूच्या ठिकाणाहून अनेक भाविक दर्शनासाठी जातात.
याशिवाय काही मंडळांनी यानिमित्त मिरवणूकही काढली होती. तर काही मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या दिवशी मंदिरांमध्ये यज्ञ, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र यांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठीही नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.