Shiv Jayanti 2026 : आरपीआयच्या वतीने ‘बहुजन प्रतिपालक’ शिवरायांना अभिवादन; लांडेवाडीत शिवजयंतीचा उत्साह
Shiv Jayanti 2026 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने लांडेवाडी येथे भव्य शिवजयंती सोहळा; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती.

Shiv Jayanti 2026 – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) आरपीआय पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर, शहर उपाध्यक्ष तथा नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी आरपीआयच्या महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश निमंत्रक विनोद चांदमारे, युवक आघाडीचे शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, शहर उपाध्यक्ष विलास गरड, संदीप तोरणे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विलासराव पाटील,
शहर संघटक अक्षय दुनघव, वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष सोनू शेख, महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष लता लगाडे, शहर युवक कार्याध्यक्ष भारत खरात, यूवा नेते राज पाटील, शहर सचिव अमोल वारभूवन, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, युवक शहर उपाध्यक्ष संतोष डेंगळे, थेरगाव शाखा अध्यक्ष विकास गाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.





